अंतर्बाह्य
Author: रत्नाकर मतकरी
Marathi translation:
Hindi translation:
Available in:
Pages:
Price:
Book Review: वृषाली जोंधळेकर
Book Review
अंतर्बाह्य हा रत्नाकर मतकरी यांचा गूढ कथांचा संग्रह.
पुस्तकाच्या प्रस्तावनेत रत्नाकर मतकरी यांनी गूढ कथा आणि भयकथा यातील फरक विश्लेषण करून दाखवला आहे. गूढकथेमध्ये काहीतरी अनपेक्षित गूढ, भीतीचा वापर असतो. अतर्क्य गूढ असतात, अनोळखी वास्तवापेक्षा वेगळी तत्व असतात. वाचकाला घाबरवणे किंवा धक्का देणे हा हेतू नसतो. गूढ कथेमध्ये आधी सूचना देऊन कलाटणीला तार्तिक बहाल केलेले असते. मानवी जीवनातील गूढता सांगणे हे तिचे कार्य असते.
भयकथेचे सामर्थ्य मात्र ती वाचताना किंवा पडद्यावर पाहतांना भीती वाटेल यात असते. स्वामित्व गाजवू पाहणाऱ्या वाईट गोष्टी, त्यांचे भयप्रद आकार, दुष्ट शक्तींचे शक्तिशाली विश्व आणि अवास्तव वादी वातावरण निर्मिती यावर भर असतो. या पुस्तकामध्ये दोन्ही प्रकारच्या कथा आहेत. मला प्रामुख्याने आवडलेल्या गूढ कथा म्हणजे: हे सारे पूर्वी कधीतरी, ती गेली, दुसऱ्या सारखा एखादा.
ह्या तिन्ही कथांमध्ये योग्य ती वातावरण निर्मिती करून वाचकांना कल्पनेच्या खेळावर झुंजावत कथेच्या शेवटी अचानक वेगळी कलाटणी देण्यात लेखक यशस्वी होतात.
या कथांचा शेवट बऱ्यापैकी वेगळा चकित करणारा आणि तरीही मूळ कथेत चपखल बसणारा आहे. अतर्क्य अवास्तववादी कथा: अंतर्बाह्य, सावळी, कोळसा पुस्तकाच्या प्रारंभी असलेल्या या तीन कथांमध्ये सतत काहीतरी वेगळं घडतं असा दाखवायचा प्रयत्न आहे, पण तो सफल होत नाही आणि शेवटही अकारण संदिग्ध आहेत. अवास्तववादी आहेत.
अगदी पठडीतल्या कथा म्हणजे पत्ता आणि जन्मोजन्मी ह्या आहेत. वाचक पुढे काय घडणार याचा अंदाज बांधू शकतो. वातावरण निर्मितीच्या प्रयत्नात कथा अजिबात फुलत नाही.
हंटेड हाऊस हि भयकथा आहे, परंतु त्यातील वातावरण निर्मिती प्रसंग आणि त्याचा वास्तवाशी जोडायचा केलेला प्रयत्न असफल ठरतो.
जन्मोजन्मी ही अनुवादित सत्यकथा आहे. भयकथा आणि गूढकथा दोन्ही नाही, त्यामुळे ही कथा या पुस्तकात समाविष्ट करण्याचे प्रयोजन कळत नाही.
कथेच्या शेवटी लेखकाने मांडलेले विचार 'पारलौकिक शास्त्र आणि त्याचे महत्व आणि हे शास्त्र न मानण्यात विज्ञाननिष्ठा मानणे' हा सखोल चर्चेचा वेगळा विषय आहे.