देशांतरीच्या कथा
Author: नीलिमा कुलकर्णी
Marathi translation:
Hindi translation:
Available in:
Pages: १२०
Price: रु. १२५
Book Review: वंदना जोशी
Book Review
देशांतरीच्या कथा हा कथा संग्रह दोन विभागात लिहिला आहे. पहिला भाग नीलिमा कुलकर्णींनी त्यांच्या चार देशातील वास्तव्यात आलेल्या अनुभवांवर लिहिला आहे. पुस्तकाच्या दुसरा भाग 'स्त्रियांचे प्रश्ण' ह्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर लिहिला आहे.
नीलिमा कुलकर्णींना त्यांचे पती रवी कुलकर्णींच्या कामा निमित्तानी इजिप्त, कोरिया, युनाइटेड अरब एमिरेट्स आणि चीन ह्या देशात रहाण्याचा अनुभव मिळाला. ह्या देशांतील संस्कृती, समाजाची जडणघडणं, सामाजिक परिस्थिती ह्या विषयावरील त्यांचे अवलोकन काल्पनिक पात्र घेऊन कथात्मक स्वरूपात मांडले आहे.
अबुधाबी वरील गोष्ट शेखा फतिमा यांच्या कार्यावर आधारित आहे. चीनच्या एक अपत्य कायद्यामुळे झालेली मानसिक कोंडमारी आणि धर्म पाळण्यावरील बिंदीमुळे झालेले लोकपरिवर्तन ह्यावर आधारित चीनवरील गोष्ट आहे. कोरियावरील गोष्ट १९८६ सालच्या राज्य क्रांतीवर आहे आणि इजिप्तवरच्या गोष्टीत देश प्रेम आणि धर्म पाळण्यात आलेलं अंधत्व आणि त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम ह्यावर आधारित आहे.
पुस्तकाच्या दुसऱ्या भागात स्त्री प्रश्नावरील गोष्टीत बायकांचे मानसिक छळ , नवऱ्याच्या नंपुसकत्वामुळे झालेली मानसीक कोंडमारी, मुलं होण्याची क्षमता नसलेल्या बाईला आणि लग्नाआधी मुलं झालेल्या बाईला समाजाची वागणूक, मुसलमान कुटुंबातील बायकांची कोंडमारी वगैरे विषय सामावलेले आहेत. पुस्तकातल्या दोन गोष्टी आतंकवादावर आधारित आहेत.
लेखिकेने प्रत्येक गोष्टीतील मुख्य पात्र आणि गोष्टीतील आशय ह्याची सुरेख मांडणी केल्यामुळे सगळ्या गोष्टी छान रंगल्या आहेत.