सारांश

Author: मधुरा वेलणकर

Marathi translation:

Hindi translation:

Available in:

Pages: १४४

Price: रु , २२०

Book Review: वसुधा खाडिलकर

Book Review

मराठी सिनेसृष्टीतील मधुरा वेलणकर-साटम ही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री असून “मधुरव” हे तिचे पहिले मराठी पुस्तक आहे. अभिनय क्षेत्रात अनेक पुरस्कारांची विजेची असलेल्या ह्या सर्वगुणसंपन्न अभिनेत्रीने तिचे स्वानुभव ललित लेखांच्या द्वारे ह्या पुस्तकात प्रकाशित केले आहेत. तिच्या प्रत्येक लेखात एक वेगळेपणा असल्यामुळे पुस्तकाची गोडी शेवटपर्यंत टिकून रहाते. ह्या लेखांमधे तिेने तिच्या भावना व विचार अगदी खरेपणाने व स्पष्टपणे व्यक्त केले आहेत. त्याचप्रमाणे स्वतःमधील उणिवा सांगताना कुठलाही संकोच बाळगलेला नाही. हे लेख आपल्याला काही काळ मागे घेऊन जातात व आपल्या आयुष्यात् घडलेल्या काही सुखद् आठवणी जाग्या करतात. लेखीकेची जुन्या चालीरीती व पद्धती ह्या बद्दलची आत्मियता प्रत्ययास येते. हल्लीच्या चढाओढीच्या आणि खर्चिक पद्धतीने मुलांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा साधेपणाने परंतु मुलांच्या आवडीनुसार व कल्पतका वापरुन करण्यात् जी गोडी असते ती काही वेगळीच् हे मनाला पटते. ‘स्वच्छंदी झाड’ ह्या लेखात नाट्यशिबीरात लहान मुलांचे व्यक्तिमत्व घडवताना त्यांना पूर्वधारणेच्या प्रभावाखाली न ठेवता त्यांच्यातील खरे व्यक्तिमत्व फुलू देण्याचा विचार मनाला पटतो. खोटेपणाचा आधार घेऊन बरेच लोक आपला बचाव कसा करतात हे वाचताना मजा वाटते. अभिनयामधे शब्द भाषा व्यतिरिक्त डोळ्यातील हावभाव स्पर्श, कृती, हातवारे ह्यांनी संबोधलेली भाषा त्याचप्रमाणे वेशभूषा, केशभूषा यांना किती महत्व असते हे कळाले. हे पुस्तक वाचताना लेखिकेने चित्रपट स्शृष्टितील तिच्या अनुभवांचा समावेश पण केला असता तर वाचावयास आवडले असते. वाचकहो, चित्रपट स्शृष्टीत् अनेक वर्ष काम करुनही त्याच्या झगमटापासून दूर राहीलेल्या ह्या गुणी अभिनेत्रीचे हे हलके, फुलके मनोरंजक पुस्तक तुम्हांला वाचायला नक्कीच् आवडेल.

Discussion Audio

CONTACT: vandana14046@gmail.com