वर्दीतल्या माणसांच्या नोंदी
Author: सदानंद दाते
Marathi translation:
Hindi translation:
Available in:
Pages: १४४
Price: रु. २००
Book Review: वंदना जोशी
Book Review
सदानंद दात्यांनी आपल्या ३० वर्षांच्या पोलीस कारकिर्दीतील काही अनुभव 'वर्दीतल्या माणसांच्या नोंदी' ह्या त्यांच्या पुस्तक लिहिले आहेत.
पोलीस आपला जीव धोक्यात टाकून काम करत असतात. वाहतूक नियंत्रण, गर्दीच नियंत्रण, राजकीय मोर्चे, जातीयवादी दंगली, गुन्हेगाऱ्यांना पकडणे, आतंकवाद्यांना पकडणे, नक्षलवाद्यांना पकडणे ही सगळीच काम पोलीस आपला जीव धोक्यात टाकून करत असतात, तरीपण समाजाला पोलिसांबद्दल आस्था वाटत नाही. ‘वर्दीतल्या माणसांच्या नोंदी’ पुस्तकात लेखकांनी अनेक प्रसंगी पोलिसंनी उत्तम केलेल्या कामाची वर्णन लिहिली आहेत. पुस्तक वाचल्यावर पोलिसांबद्दलच जनमत चांगलं व्हावं अशी लेखकाची इच्छा आहे.
दात्यांनी कष्ट करून, मेहनत करून अभ्यास केला आणि पोलीस दलात प्रवेश मिळवला. कायम कायद्याच्या चौकटीत राहून काम केले. त्यांना अनेक उत्तम काम करणारे अधिकारी आणि सहकारी लाभले. कामाचे नियोजन आणि सुव्यवस्था यांचे कटाक्षाने पालन करुन अतिशय कठीण जबाबदाऱ्या उत्तम पार पडल्या. त्यांना विशेष वाटलेल्या त्यांच्या कामाच्या काही नोंदी त्यांनी नमूद केल्या आहेत.
२००८ साली लालबागच्या गणपतीचा अमृतमहोत्सव होता. नेहमींपेक्षा खूप लोक दर्शनाला आली, हजारोंनी लोक उपस्थित होती, ७-८ किलो मीटर लांब दर्शन घेणाऱ्यांची रांग होती. पूर्वनियोजित आखणी आणि शिस्त पाळल्या मुळे चेंगरा चेंगरी सारखे प्रसंग घडले नाहीत.
२६/११/२००८ साली पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर विविध ठिकाणी केलेला हल्ला आणि कामा हॉस्पिटलवर केलेला हल्ला ह्यावरच्या लेखात दाते म्हणतात, त्या दिवशी मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठतेचे आणि बहादुरीचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत.
२०१२ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकऱ्यांचं देहावसान झाल्यावर त्यांच्या अंत्यसंस्कारास काही लाख लोक हजार होती. टिळक आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतयात्रेची माहिती आधीच अभ्यासल्यामुळे त्या माहितीचा त्यांना व्यवस्था करण्यास उपयोग झाला आणि त्यांनी इतर आधिकार्यांच्या सहकार्यानी गर्दीचं नियंत्रण सुरळीत पार पाडलं.
हे वरती लिहिलेले काही प्रसंग आणि इतर अनेक प्रसंग लेखकांनी पुस्तकात लिहिले आहेत त्याच बरोबर पोलीस खात्यात काय बदल घडून आणायला हवेत ह्या विषयावर पण लिहिले आहे.
हे पुस्तक पोलीस खात्यातील काम करणाऱ्यांना एक आदर्श पोलीस अधिकाऱ्याच्या कामाची माहिती देते तर सामान्य जनतेला पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेची माहिती देते त्यामुळे हे पुस्तक सर्वजनांसाठी वाचनीय आहे.